LATEST UPDATES
🌿✨ अभोरा ग्रामपंचायतीत आपले मनःपूर्वक स्वागत! ✨🌿 आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपले हार्दिक स्वागत! ✨ "एकत्र येऊया, गावाचा व देशाचा विकास घडवूया!" 🚜🏡 🎉 जय हिंद! जय भारत! 🙏

पूर्वेला प्रत्यक्ष शिवशंकराचे अस्तित्व असलेले लहरी बाबा यांच्या साक्षीने, पश्चिमेला नागरा शिवलिंगाचे अधिष्ठान असून, उत्तरेला कोरणी घाट येथे विठ्ठल-रुख्मिणी यांचे सानिध्य आहे. दक्षिणेला मनोहरभाई पटेल हे शैक्षणिक जीवन जगण्याचा नवा संदेश देत आहेत. अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक परंपरेने नटलेल्या ग्राम पंचायत अंभोरा हा एकच महसुली गाव आहे. ग्राम पंचायत अंतर्गत सामान्य जनतेस आरोग्यविषयक सुविधा प्रदान करण्यासाठी सावरी येथे आरोग्य उपकेंद्र उपलब्ध आहे. गावात १ प्राथमिक शाळा, जी डिजिटल प्रणालीत समाविष्ट असून, अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्रदान करते. प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडीसाठी पदाधिकारी व अधिकारी हातात हात घालून अविरत प्रयत्नशील आहेत.

Read more

लोकसंख्या व प्रशासन

  • 2526 एकूण लोकसंख्या:
  • 3 वॉर्ड:
  • 1 सरपंच:
  • 9 सदस्य संख्या:
01

शेती व हवामान

  • 429.75 एकूण क्षेत्रफळ:
  • 314 शेतीयोग्य जमीन:
  • धान मुख्य पीक:
  • वार्षिक पर्जन्यमान: 1000-1200 मिमी
  • 2023-24 मध्ये पर्जन्यमान: 1150 मिमी
02

शैक्षणिक व आरोग्य सुविधा

  • 1 शाळा: डिजिटल प्राथमिक शाळा
  • 2 अंगणवाडी केंद्र:
  • 1 आरोग्य सुविधा:
03

सामाजिक व आर्थिक संस्था

  • 51 बचत गट:
  • 1 सहकारी संस्था:
  • 2 युवक मंडळ:
  • 2 महिला मंडळ:
04

ग्राम पंचायतची वैशिष्टये

महात्मा गांधी तंटामुक्त गाव

महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त अंभोरा ग्रामपंचायतने समाजातील एकतेला प्रोत्साहन दिले आहे.

हागणदारी मुक्त

अंभोरा ग्रामपंचायतीने 100% ऑनलाईन (ODF) हागणदारी मुक्त ग्रामपंचायत म्हणून एक महत्त्वपूर्ण साध्य प्राप्त केली आहे.

ग्राम स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत अंभोरा ग्रामपंचायतीने तालुका स्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त केला आहे.

रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्वाधिक मजुरांना रोजगार देणाऱ्या जिल्ह्यातील अंभोरा ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत आहे.

डिजिटल शाळा

१००% डिजिटल शाळा असलेली अंभोरा ग्रामपंचायत एक आदर्श उदाहरण आहे.

लोकसहभागा

लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविणारी अंभोरा ग्रामपंचायत समाजातील विकासासाठी एक आदर्श ठरली आहे.