पूर्वेला प्रत्यक्ष शिवशंकराचे अस्तित्व असलेले लहरी बाबा यांच्या साक्षीने, पश्चिमेला नागरा शिवलिंगाचे अधिष्ठान असून, उत्तरेला कोरणी घाट येथे विठ्ठल-रुख्मिणी यांचे सानिध्य आहे. दक्षिणेला मनोहरभाई पटेल हे शैक्षणिक जीवन जगण्याचा नवा संदेश देत आहेत. अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक परंपरेने नटलेल्या ग्राम पंचायत अंभोरा हा एकच महसुली गाव आहे.
ग्राम पंचायत अंतर्गत सामान्य जनतेस आरोग्यविषयक सुविधा प्रदान करण्यासाठी सावरी येथे आरोग्य उपकेंद्र उपलब्ध आहे. गावात १ प्राथमिक शाळा, जी डिजिटल प्रणालीत समाविष्ट असून, अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्रदान करते.
प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडीसाठी पदाधिकारी व अधिकारी हातात हात घालून अविरत प्रयत्नशील आहेत.
Read more